मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राजाची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा राजाच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्याने तर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार यांनी राजभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य नऊ मंत्र्यांनी देखील शपथ घेऊन सरकारमध्ये येण्याचा विचार केलाय. यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी दावा ठोकला आहे. त्यामुळे तसेच येणाऱ्या सगळ्या निवडणुका या राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर आता सर्वात मोठं आव्हान अजित पवार यांनी उभं केलाय. यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवारांचा समावेश झाल्याने राजकीय समीकरणं बदलली आहेत. यातच आता राज्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे. परंतु यातच राज्यात अजित पवारांचा भाजपला राजकीय भक्कम पाठिंबा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
दरम्यान, राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर आता केंद्रात देखील मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरतच केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादींच्या खासदारांचा देखील समावेश केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात स्थान मिळाल्यानंतर राज्यात अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा