मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला असून पुढच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हांवर लढणार असल्याचं म्हटलं आहे. यातच आता दोन्ही बाजूंनी आमदार आणि खासदारांनी आपली बाजू सांगितली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. राजभवनावर अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी शपथ घेतली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खा. अमोल कोल्हे, खजिनदार सुनील तटकरे तसेच विधानसभेच्या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, नीलेश लंके, अतुल बेनके, संग्राम जगताप, सुनील टिंगरे, किरण लहामटे, अशोक पवार, सरोज अहिर, शेखर निकम, दौलत दरोडा, सुनिल शेळके, दीपक चव्हाण, दत्ता भरणे उपस्थित होते. विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरही अजित पवारांबरोबर आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
काकांसोबत? ‘मी साहेबांबरोबर…’ असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण शरद पवार यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवारांबरोबर न गेलेल्या नेत्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश होता. शपधविधी सोहळ्यात किंवा पवारांनी ‘देवगिरी’ बंगल्यावर बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नसलेल्या आमदारांमध्ये राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, इंद्रनील नाईक, चंद्रकांत नवघरे, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील भुसारा, दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, चेतन तुपे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, प्रकाश सोळंखे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, बबन शिंदे, यशवंत माने, मकरंद जाधव, राजेश पाटील, मानसिंग नाईक, सुमनताई पाटील यांचा समावेश. नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. अनुपस्थित असलेले किती आमदार अजित पवारांबरोबर जायला तयार आहेत, हे कळू शकलेले नाही. येत्या एक-दोन दिवसात त्याबाबतचे चित्र स्पष्ट होऊ शकेल.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”