मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. काल राजभवनात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. तर पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बडतर्फांची कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला
दरम्यान, राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव यांची राष्ट्रवादीच्या ६ जिल्ह्यांचा संघटनेचा कारभार देण्यात आला आहे. राखीताई जाधव यांची या अगोदर पार्टीच्या कार्याध्यक्ष पदी यापुर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बळकटीकरण्यासाठी व मजबुत करण्यासाछी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहिल असं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्ष पदी श्रीमती राखी जाधव यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर आजपासून मुंबई विभागातील सर्व ६ जिल्ह्याच्या संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. pic.twitter.com/aneVoq05NV
— NCP (@NCPspeaks) July 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील