मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये खासदार सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील ३५ आमदार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यास सुरुवात केलीय. यामध्ये पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अकोला जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. जयंत पाटील यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला जात असताना आता अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील
दरम्यान, शरद पवार यांनी आपण असे अनेक प्रसंग बघितले असून नव्याने पक्षाची उभारणी करण्याचा नारा देत पक्षाबंधीला सुरुवात केली आहे. आज पवार यांनी कराडला जात स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पक्षातील कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी