मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे. आज अजित पवार गटाकडून काही नेत्यांच्या पक्षात नवीन नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर आज अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नेमणुक करण्यात आली आहे. तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुरज चव्हाण यांची नेमणुक केली आहे. यामुळे आता अजित पवार आणि शरद पवार सामना सुरू झाला आहे.
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
दरम्यान, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचं अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तशा पद्धतीचं पत्र काल विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आल्याचंही सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत