मुंबई : कोविड काळात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सुजित पाटकर त्यानंतर रविंद्र वायकर आणि आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ठाकरे गटाला इशारा दिला होता. पावसाळी अधिवेशनात शिंदेंनी कोविड घोटाळ्यासंदर्भात आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चर्चेंना उधाणं आलं आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
दरम्यान, कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर मुंबईतील आग्रीपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यात पेडणकेरांसह दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड काळात २ हजार बॉडी बॅगची ६ हजार 800 रूपयांना खरेदी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. संबंधित कंत्राददाराला यासंदर्भात कंत्राट किशोरी पेडणेकर यांच्या आदेशाने देण्यात आला आहे. २१ जुन रोजी मारलेल्या छाप्यात 68 लाख, 65 हजार रोख आणि १५० कोटीची स्थावर मालमत्ता सील केली होती. याशिवाय १५ कोटी रूपयांची एफडी आणि इतर गुंतवणुकही इडीला आढळली होती.
READ ALSO :
मिशन विदर्भ..! अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे, विदर्भात ताकद वाढवणार
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला