नागपूर : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता अजित पवार गटाने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांकडे लक्ष वेधले आहेत. या निवडणुकांसाठी आता राज्यात महायुती म्हणून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणून एकत्रित लढवणार आहेत. त्यासाठी आता अजित पवार गटाने विदर्भाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
लवकरच अजित पवार गटाचे विदर्भात मेळावे होणार असल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा आत्रम यांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवार विदर्भ दौरा करणार आहेत. यासाठी लवकरच वेळ आणि तारिख ठरवली जाणार आहे. विदर्भात ते नागपुर, चंद्रपुर, वर्धा, गोदिंया या जिल्ह्यात अजित पवार गटाचे मेळावे होतील असंही आत्रम यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
दरम्यान, विदर्भात लोकसभेच्या ११ जागा असून त्यात विधानसभेचे ६२ मतदार संघ येतात. त्यामुळे आता महायुतीतील भाजप आणि शिंदे गट तसेच अजित पवार गटाला जागा कशा वाट्याला येणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सभागृहात काय फक्त अंड उबवायला जातात का ?” तुपकरांचा गुलाबराव पाटलांना खोचक सवाल
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देण्याऱ्याला भाजपने कार्यकारिणीत घेतलं, सुप्रिया सुळेंचा संताप, थेट “फडणवीसांना…”
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला