पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल भाजपच्या सोशल मीडिया कार्यकाराणी जाहीर केली आहे. यात संयोजक आणि सहसंयोजक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी दिल्या प्रकरणी तुरूंगात गेलेल्या निखिल भामरेला सहसंयोजक पदी नेमणुक केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टिका केली आहे.
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपने सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली. देवेंद्र फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धातांचे पालन करताय का ? एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार
दरम्यान, निखील भामरेनी शरद पवार यांना ट्विटवर जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन तुरूंगात डांबलं होतं. यावरून विरोधकांनी जोरदार टिका केली होती.
आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपाने सोशल मिडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली. देवेंद्रजी – तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धा़तांचे पालन करताय का? एका गुन्हेगारी…
— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिरुर लोकसभा प्रमुख महेश लांडगे, समन्वयकपदी राजेश पांडे : ‘त्या’ चर्चेत तथ्य नाही!
हेही वाचा…“शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते, म्हणूनच..,” आव्हाडांचा भाजपला टोला
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”