मुंबई : काॅंग्रेसने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विदर्भातील विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही विदर्भातील दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे देण्यात आले आहे. यामुळे पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले असून प्रदेशाध्यक्षपद हे मराठवाड्यातील काॅंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडे जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे
अजित पवार यांनी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते पद कुणाला मिळणार ? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. यातच आता विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. यातच आता सरकारमधील अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सारख्या बड्या नेत्यांना वडेट्टीवार टॅकल करू शकणार का ? असा सवाल देखील निर्माण होतो.
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका
दरम्यान, मागील काही महिन्यात काॅंग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली होती. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष पद बदलाच्या हालाचाली सुरू झाल्या होत्या. यासाठी विजय वडेट्टीवार यांच्या सह काॅंग्रेसच्या नेत्यांनी दिल्ली गाठली होती. परंतु अद्यापही प्रदेशाध्यक्षपदाला कोणाताही धोका निर्माण झाला नाही. परंतु विदर्भातच विरोधी पक्षनेते पद आणि प्रदेशाध्यक्ष पद गेल्याने आता नाना पटोलेंना धोका निर्माण झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, पण..,” सामानातून जोरदार टिका