मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जाऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी घेतली होती. परंतु हा कार्यक्रम राजकीय नसून सामाजिक असल्याचं सांगत शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यावरून आता सामानातून या क्रायक्रमावर टिका करण्यात आली आहे.
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?
देश मोदींच्या हुकूमशाहीविरूद्ध लढतोय व त्या लढ्यासाठी इंडीया ही आक्रमक आघाडी तयार झाली आहे. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्वाचे शिलेदार आहेत. मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खत्म करून, सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याएवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. असं सामानातून म्हटलं आहे.
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे पुण्यात येत आहेत. पुणे भेटीचा ते पुरेपूर राजकीय वापर करून घेतील. कारण कसब्यातील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे मोदी भेटीत स्वत:चीही महाआरती करून घेईल. याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, पण पुरस्कार सोहळ्यात शरद पवार हे खास व्यासपीठावर उपस्थित राहतील व शरद पवारांच्या हस्ते परहस्ते मोदींना पुरस्कार, टिळक पगडी देऊन सन्मानित केले जाईल. वादाची ठिणगी इथे पडली आहे. मोदी यांना टिळक पुरस्कार देऊ नये असे अनेकांचे सांगणे होते. पण टिळक कुटुंब हे बरेचसे भाजपमय झाले. त्यामुळे टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज