पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या पुणे दौरा असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचसोबत नरेंद्र मोदी पुण्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून यामध्ये पुणे मेट्रो मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण करणार आहेत.
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन होणार असून सकाळी ११ वाजता पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन आरती करणार आहेत. त्यानंतर ते ११.४५ ला पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पुणे मेट्रोच्या २ मार्गिकेचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्याच दरम्यान ते पिंपरीत टु एनर्जी संयंत्रणाचं उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
दरम्यान, पीएम आवाज योजनेतील १२८० घरं हस्तांतरीत करणार आहेत. त्याचबरोबर मनपा बांधणार असणारी ६४०० घरांची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा. ते दुपारी ३ वा. दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.
READ ALSO :
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं