मुंबई : आगामी निवडणुका लक्षात ठेऊन अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पक्षांतर्गत करीत आहेत. यामध्ये भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. अनेक आजी माजी आमदार, खासदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने देखील भाजपसोबत युती स्थापन केली आहे. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्वांवर भाष्य करीत भाजपला फटकारलं आहे.
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
आज ना उद्या निवडणुका होतील पण केवळ पंतप्रधान मोदींच्या नावावर, नितीन गडकरी किंवा फडणवीस यांच्या नावावर तुम्हाला फार काळ सत्ता मिळवता येणार नाही, जनतेच्या ह्यदयात स्थान मिळवा, जनतेची कामे करा. कार्यकर्ता महत्वाचा आहे. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खाशी समरस व्हा. कार्यकर्ता टिकला तर पक्ष टिकेल. त्यामुळे सत्ता आहे म्हणून तुमच्या जवळ येणाऱ्यांच्या फार नादी लागू नका. असं म्हणत नितीन गडकरी यांनी भाजपला फटकारलं आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
जात, पंथ, धर्म याकडे लक्ष न देता पक्ष कार्यकर्त्यांच्या कामावर मोठा झाला पाहिजे. देशाच्या निर्मितीसाठी हे तत्व महत्वाचे आहे. समर्पित भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, ते वाढले तरच राजकीय दष्ट्या मोठे यश मिळेल असंही गडकरींनी म्हटले आहे.
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
दरम्यान, आज पक्षाच्या नदीत इनकमिंगचा पुर आला आहे. मात्र लक्षात ठेवा, नदीचा पुर जास्त दिवस राहत नाही. २५ टक्के लोक तुमच्या पक्षाशी विचाराने जोडलेले असतात तर ४५ टक्के लोक केवळ सत्ता आहे, म्हणून संधी साधून तुमच्याजवळ आलेले असतात. त्यामुळे पक्षावर मनापासून प्रेम करणारे जोडा, खासदार, मंत्री, आमदार माजी होतात. मात्र कार्यकर्ता कधीही माजी होत नाही त्यांच्याकडे लक्ष द्या. तसेच विविध समाजाच्या आघाड्या करताना आजबरे वाटत असले तरी उद्या निवडणुकीत त्यांना संधी न मिळाल्यास उलट डोकेदुखी वाढल्याशिवाय राहणार नाही. असंही गडकरींनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..