मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांत मोठे बदल करण्यात येत आहेत. यातच आता भाजपने राष्ट्रीय पातळीवर बदल केले असून यामध्ये महाराष्ट्राच्या तीन नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय पातळीवर वर्णी लागली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांचा राष्ट्रीय कार्यकारणीत समावेश करून घेतला आहे.
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”
भाजपकडून यावेळी एकूण १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस व १२ सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच तेलंगणा भाजपचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे.
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
पंकजा मुंडे यांच्यावरील राष्ट्रीय सचिव म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत. तर विजया रहाटकर यांना आता भाजपने राष्टीय सचिव म्हणून नियुक्त केले आहेत. यामध्ये सुनील देवधर यांना स्थान देण्यात आलेलं नाही. परंतु राष्ट्रीय सचिव पदावरून राष्ट्रीय महासचिव पदी विनोद तावडे यांची नियुक्ती केली आहे. अगदी कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास विनोद तावडे यांनी कमावला असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या यादीत सी टी रवी जे महाराष्ट्राचे प्रभारी होते. त्यांना देखील आता वगळण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा नवा प्रभारी लवकरच नेमावा लागणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुक पराभूत झालेले सी टी रवी लोकसभा निवडणुकीआधी काॅंग्रेस भाजप दोन्ही पक्षांत नवे प्रभारी येणार आहेत.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/0aaArxHF30
— BJP (@BJP4India) July 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंना अजून एक मोठा झटका…! ठाकरेंचा बडा नेता शिदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर