मुंबई : महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्याविरोधात् राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुण्यातील बालगंर्धव चौकात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जोरदार घोषणाबाजी करीत भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील भिडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
मनोहर भिडे नावाची घाण पुज्य महात्मा गांधींवर गरळ ओकून गेली. मात्र सरकारने गांभीर्याने घेतले नाही, याचे वाईट वाटते. अशी सडकी पिलावळ महाराष्ट्रात वळवळ करत असेल, महामानवाच्या आईच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असेल आणि जनता शांत राहत असेल तर हे लक्षण ठिक नाही. असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
दरम्यान, पुज्य महात्मा गांधी यांच्याबाबत अकलेचे तारे तोडणाऱ्या नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या या भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी. सरकारने गांभीर्याने घ्यावे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
मनोहर भिडे नावाची घाण पुज्य म. गांधींवर गरळ ओकुन गेली.मात्र सरकारने गांभीर्याने घेतले नाही याचे वाईट वाटते.अशी सडकी पिलावळ महाराष्ट्रात वळवळ करत असेल,महामानवाच्या आईच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवत असेल आणि जनता शांत राहत असेल तर हे लक्षण ठिक नाही #काळादिवस
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..