मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंझे यांची कन्या पायलट होऊन परदेशी नोकरीसाठी गेली आहे. तिची करिअरमधील ही उंच भरारी शरद पौंक्षे यांनी सोशल मीडियाद्वारे सर्वांना कौतुकाने सांगितली.तिचं कौतुक करताना पौंक्षे यांनी आरक्षणाचा उल्लेख केला होता. त्यावर आता त्यांच्यावर सगळीकडून टिका करण्यात येत आहेत. त्यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
शरद पौंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं होतं की, कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत.कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा.
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
त्यावर लेक कुणाचीही असो तिचं कौतुक झालंच पाहिजे. पण शरदराव कौतुक करताना सुध्दा माणूस म्हणून कसे आपण क्षुद्र किंवा नालायक आहोत हे दाखवायलाच हवे का ? शरदराव, “भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा ही अहिंसा मानली जात नाही. हे माहीत असेलच तुम्हाला. उलट ज्याच्यामध्ये कमालीचं बाहुबल आहे, भल्या भल्यांना सहज धूळ चारण्याची धमक आहे. पण तरीही जो आपल्या बलाचा प्रयोग निष्कारण करत नाही तो खऱ्या अर्थाने अहिंसा मानणारा.” हे इथे लिहिण्याचे कारण म्हणजे आज माझ्या राजकीय कारकीर्दीला अर्थात मी शिवसेनेत प्रवेश केला या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ना कुठलं जातीय किंवा आर्थिक पाठबळ आहे. पण कुठल्याही जातीय आर्थिक आरक्षणाशिवाय माझ्या गुणवत्तेने मी काय करू शकते हे एक वर्षात तुमच्यासह महाराष्ट्राने बघितलंच आहे. असं अंधारे यांनी म्हटलं आहे.
View this post on Instagram
READ ALSO :
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
हेही वाचा…सरकारचा निष्काळजीपणा..! तर इर्शाळवाडी दुर्घटना वाचली असती, २०१५ सालीच पत्र दिलं होतं, पण…
हेही वाचा…“आमदार अन् जिल्ह्याध्यक्षांना दिलं टार्गेट, कागदपत्र जुळवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार हालचाली”
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा