मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार मुख्यमंत्री बनण्यासाठीच महायुतीत सामील झाले अशा चर्चा रंगू लागल्या. तसेच अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्ये देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलीत. यावरून प्रफुल्ल पटेल यांनी देखील असचं वक्तव्य केलं.त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर टोला हाणला आहे.
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका
अजित पवार हे आज ना उद्या मुख्यमंत्री होतील. परंतु आत्ता मुख्यमंत्री पद रिकामं नाही. त्यामुळे यावर चर्चा कशासाठी करताय? अजित पवार हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. कधी ना कधी ते मुख्यमंत्री होतील. काम करणाऱ्या मासाला आज ना उद्या, उद्या नाहीतर परवा, अशी संधी नक्कीच मिळते. अनेकांना अशी संधी मिळाली आहे. त्यामुळे अजित पवारही आज नाही तर उद्या नक्कीच मुख्यमंत्री होतील. असं पटेल यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
दरम्यान, महायुतीत आमचे १०५ आमदार आहेत, आमच्याबरोबर जे सात आमदार आहेत. त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार ? कसा होणार ? यावरील चर्चेला काही अर्थ नाही. अशा प्रकारचं वक्तव्य महायुतीतल्या आमच्या कुठल्या सहकाऱ्याने करण्याऐवजी पक्षाचे वरिष्ट नेते यावर भूमिका मांडतील. आमच्या सारख्या लोकांनी यावर बोलणं योग्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते या विषयावर बोलले आहेत. त्यामुळे या चर्चेला आता पुर्णविराम द्यावा आणि युती धर्माचं पालनं करावं. अस पडळकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस