मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून ठाकरेंनी भाजपवर टिकास्त्र सोडलं आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन
बावनकुळे म्हणाले की, मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत, भन्नाट. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत.
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे. उद्धव ठाकरे तुम्हाला तुमच्या आमदारांचं नेतृत्व करता आलं नाही. ते तुमच्या नाकर्तेपणामुळे नाकाखालून निघून गेले. मुख्यमंत्री असताना तुम्ही मातोश्री बाहेर पडले नाहीत आणि आता लोकांना दोष देत आहात. कुटनीतीला कुटण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. कारण २०१९ साली युतीत निवडणूक लढून तुम्ही महागद्दारी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. अशी टिकाही त्यांनी केली.
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, तेव्हांच तुम्ही नितीमत्ता पायाखाली तुडवली होती. त्यामुळे घरात बसून निती-अनितीच्या गप्पा तुम्ही मारु नका. घराणेशाही टिकवण्यासाठी एकत्र आलेल्या ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं आता लोकशाही टिकवण्याच्या गप्पा मारत आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझा मुलगा एवढाच विचार करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे मोठा विनोदच आहे.
मी, माझा पेपर, स्वकियांशी माझा झालेला सामना, मीच संपादक, माझाच मुलाखतकार,माझीच मुलाखत… भन्नाट!
हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल कलानगर शेजारील मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर मुजरा करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे
हेही वाचा…“शिरीष कणेकरांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही