मुंबई : सध्या संपुर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने अनेकांना वाहतुकीचा सामाना देखील करायला लागत आहेत. अनेक शहारांत पावसामुळे वाहतुक व्यवस्था कोलमंडली आहे. यातच वाहतुकीचा सामाना विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांना देखील करायला लागला. पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला निघाले असता त्यांना वाहतुकी कोंडीचा सामाना करावा लागला आहे.
हेही वाचा…कार्यकर्त्यांना ताकद देणार अन् ‘अब की बार १२५ पार’ करणार.! नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
सत्यजीत तांबे आज संगमनेरवरून मुंबईला निघाले असता त्यांना नाशिक-हायवे वर भिवंडी येथे ३ ते ४ तास ट्राॅफिकमध्ये अडकल्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यानंतर त्यांनी कल्याणवरून लोकलने प्रवास करून विधानभवनात दाखल झाले. याबद्दल त्यांनी विधानसभेत देखील या घटनेची चर्चा करण्यात आली. तर याबद्दल त्यांनी ट्विटवर याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…भाजप प्रवेशाच्या चर्चांना अशोक चव्हाणांनी दिलं पुर्णविराम, म्हणाले, “काॅंग्रेसमधीलच माझे हिंतचितकं….,”
दरम्यान, ट्विट करीत म्हणाले की, दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३० मिनिटांच्या प्रवासाला ३ तास लागले व अखेर आता ट्रेनने मुंबईकडे निघालोय. खरंतर आज माझा मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघर पासून पनवेल पर्यंत तर कल्याण-डोंबिवली पासून मुंबई पर्यंतच्या जनतेविषयी प्रचंड आदर वाढलाय, किती सहनशील जनता आहे ! मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा पुरा बोजवारा उडालाय, माणसाची जीवनशैलीची ऐंशी की तैशी झालीय, पण आपली सहनशिलता अजूनही संपायचे नाव घेत नाही.
दुपारपासून संगमनेरवरुन मुंबईला अधिवेशनास उपस्थित रहाण्यासाठी निघालो. नाशिक-मुंबई हायवे वर भिवंडी येथे ३-४ तास ट्रॅफिकमध्ये अडकलो, शेवटी एका मित्राने सल्ला दिला की, कल्याणवरुन लोकल ट्रेनने लवकर पोहोचशील, मग काय भिवंडी बायपासवरुन कल्याणच्या दिशेने प्रवास सुरु झाला, तेथेही ३०… pic.twitter.com/hWyvmMbDFY
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र होऊन, अजित पवार मुख्यमंत्री होतील”? राज्यात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत