मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंतच सर्वांनाच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. तर याआधी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर राज्यात देखील आता अजित पवारच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच गोष्टींवर अनिल पाटील यांना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यासमोरच झापलं असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…भाजप प्रवेशाच्या चर्चांना अशोक चव्हाणांनी दिलं पुर्णविराम, म्हणाले, “काॅंग्रेसमधीलच माझे हिंतचितकं….,”
आगामी काळात राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहे, अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातच आता अनिल पाटील यांनी देखील यावर भाष्य केलं होतं. त्यावर अजित पवारांच्या आदेशनानंतर अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…अजित दादांची हाक..! वाढदिवसाचा खर्च टाळून इर्शाळवाडीच्या लोकांसाठी तब्बल ‘इतके’ रूपये झाले जमा
दरम्यान, आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे, त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या १० ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतराबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवणुक पाहता दिली जाईल. अशी शक्यता देखील चव्हाण यांनी वर्तवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र होऊन, अजित पवार मुख्यमंत्री होतील”? राज्यात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत
हेही वाचा…कार्यकर्त्यांना ताकद देणार अन् ‘अब की बार १२५ पार’ करणार.! नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास