पुणे : विनोद हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर मानवी मनाच्या पडद्याआडच्या व्यथांचा आरसादेखील असतो हे वास्तव आपल्या दमदार लेखणीतून तब्बल सहा दशके सिद्ध करणारे सिद्धहस्त लेखक, समीक्षक आणि कलावंत शिरीष कणेकर यांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा
अगदी कालपरवापर्यंत आपल्या असंख्य मराठी रसिक वाचकांची मने आपल्या हळव्या विनोदाने चिंब भिजविणाऱ्या कणेकरांच्या लेखणीने महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या संवेदनांवर हलक्याफुलक्या शैलीत संस्कार केले. मराठी साहित्यविश्वात चौफेर लेखण करणारा, इंग्रजी माध्यमविश्वात वावरलेला पहिला पत्रकार म्हणून कणेकर यांनी पत्रकारिता व साहित्यक्षेत्रातही आपले स्थान निर्माण केले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती
लिखाणाचा आणि रसिक वाचकांना खमंग साहित्याचा नजराणा देण्याचा ध्यास कणेकरांनी अक्षर:श अखेरच्या श्वासापर्यंत जपला. प्रचंड पुस्तकसंपदा, हजारो वृत्तपत्रीय लेख, प्रंचड जनसंपर्क, चित्रपट, नाट्य, साहित्य पत्रकारिता, अशा अनेक क्षेत्रातत सहजपणे वावरणारा आणि तुफान लोकप्रियता मिळविणारा शिरीष कणेकर नावाचा एक मुलखावेगळा माणूस आज एका अज्ञाताच्या प्रवासास निघून गेला. त्यांचा साहित्यरूपी वारसा मराठी जनमानसावर यापुढेही तसेच गारुड घालत राहील. शिरीष कणेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठीची आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक-सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो आणि कणेकर कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याचे बळ मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना… भावपूर्ण श्रद्धांजली! असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
विनोद हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर मानवी मनाच्या पडद्याआडच्या व्यथांचा आरसादेखील असतो हे वास्तव आपल्या दमदार लेखणीतून तब्बल सहा दशके सिद्ध करणारे सिद्धहस्त लेखक, समीक्षक आणि कलावंत शिरीष कणेकर यांच्या दुःखद निधनाची बातमी पचविणे अवघड आहे. अगदी कालपरवापर्यंत आपल्या असंख्य… pic.twitter.com/L4kHCJLi6d
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही
ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा