मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधीचा वाटप केला आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ४० आमदार सत्तेबाहेर पडले. परंतु शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुन्हा अजित पवार यांच्याकडे अर्थखातं आल्याने निधीवाटपात भेदभाव केला जाईल का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. यातच आता राज्यातील आमदारांना निधीवाटप करण्यात आला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अपात्र होऊन, अजित पवार मुख्यमंत्री होतील”? राज्यात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीत
पावासाळी अधिवेशनाच्या सुरूवातीलाच मांडलेल्या पुरवणी मागण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रूपयांचा निधी दिला आहे. भाजपचे गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बब यांना सर्वाधिक ७४२ कोटी रूपयांचा निधी दिल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाळवा या मतदारसंघात तब्बल ५८० कोटी ३१ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे.
हेही वाचा…कार्यकर्त्यांना ताकद देणार अन् ‘अब की बार १२५ पार’ करणार.! नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
निधीवाटप
( राष्ट्रवादी शरद पवार गट )
जंयत पाटील, वाळवा- ५८० कोटी
राजेश टोपे, घनसावंगी- २९३ कोटी
रोहित पवार, कर्जत-जामखेड- २१० कोटी
संदीप क्षीरसागर, बीड- ३५ कोटी
राष्ट्रवादी ( अजित पवार गट )
दत्ता भरणे, इंदापूर- ४३६ कोटी
मकरंद पाटील, वाई-खंडाळा-महाबळेश्वर-२९१ कोटी
किरण लहामटे, अकोले-११६ कोटी
दिलीप वळसे-पाटील, आंबेगाव-९६ कोटी
अजित पवार, बारामती- ७३ कोटी
अदिती तटकरे, श्रीवर्धन- ४० कोटी
माणिकराव कोकाटे, सिन्नर- ३३ कोटी
छगन भुजबळ, येवला- ३१ कोटी
हसन मुश्रीफ, कागल- २२ कोटी
धनंजय मुंडे, परळी- २१ कोटी
प्रकाश साळुंखे, गेवराई-१३ कोटी
शिवसेना
अब्दुल सत्तार, सिल्लोड- ५८ कोटी
भरत गोगावले, महाड- १३४ कोटी
महेंद्र दळवी, अलिबाग- ४५ कोटी
महेंद्र थोरवे, कर्जत- ४८ कोटी
संदीपान भुमरे, पैठण- २९ कोटी
संतोष बांगर, कळमनुरी- १९ कोटी
भाजप
प्रशांत बब, गंगापूर- ७४२ कोटी
महेश बालदी, उरण-२८ कोटी
माकप
विनोद निकोले, डहाणू- ७६ कोटी
काँग्रेसच्या १५ आमदारांना शून्य निधी निधी वाटपात काँग्रेसच्या १५ आमदारांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही, तर २० आमदारांना केवळ १ ते ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांच्या तोंडालाही निधी वाटपात पाने पुसण्यात आली आहेत.
READ ALSO :
ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
हेही वाचा…“आमदार आणि जनतेत निर्माण झालेला असंतोष दुरा करा, अन्यथा…”, सत्ताधाऱ्यांना विरोधकांना दिला कडक इशारा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजपला राजस्थान, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात किती जागा मिळणार? सर्व्हेत आली मोठी माहिती