मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका, माजी सभागृह नेत्या आणि सात वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री बदल्याची चर्चा, अनिल पाटलांना एकनाथ शिंदेंसमोरच अजित पवारांनी झाप झाप झापलं
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने तसेच इर्शाळवाडी दुर्घटनेवेळी ज्या पद्धतीने मदतकार्यात स्वतःला झोकून देऊन काम केले, लोकांना धीर दिला आणि अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारले, ते पाहून माझया नेतृत्वाबद्दल मनात आदर निर्माण झाल्यानेच शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे मत तृष्णा विश्वासराव यांनी यासमयी व्यक्त केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“याद राखा..,! आम्ही तुम्हाला सोडणार नाही”, रोहित पवारांनी संजय शिरसाठांना दिला इशारा
दरम्यान, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण अंगिकारून राज्य सरकारचे काम सुरू असून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांनी आखून दिलेल्या तत्वावर कार्य करताना संकटकाळात मदतीसाठी धावून जाणे हे शिवसैनिकाचे कर्तव्य असून कार्यकर्ता मुख्यमंत्री म्हणून मदतीला धावून गेलो असे यावेळी नमूद केले. मुंबईचा कायापालट करून गेल्या १५ वर्षांत जे काम झाले नाही ते करायला सुरुवात केली असून आपल्या विभागातील प्रश्न देखील सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे यावेळी स्पष्ट केले.
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ.तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची #शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची… pic.twitter.com/maRYdswT93
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे
हेही वाचा…“शिरीष कणेकरांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही
ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन