मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामुळे ठाकरेंना याचा मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा…“भेकड आणि भित्र्या माणसाची अहिंसा”, शरद पोंक्षेंवर सुषमा अंधारे भडकल्या
१९९४ पासून मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असलेल्या सातमकर यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवले होते. यातच आज राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने १० हजार आणि दुकानासाठी ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच उमेद अंतर्गत येणाऱ्या महिला बचत गटांना भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी शिंदेंनी सांगितले.
हेही वाचा…“संभाजी भिडेंचे बोलविता धनी कोण ? तात्काळ तुरूंगात टाका”, यशोमती ठाकूर आक्रमक
दरम्यान, राज्यात युती सरकार आल्यापासून प्रत्येक निर्णय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. एखादा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा नेत्याने त्याच्या मागे ठामपणे उभे रहावे अशी त्याची अपेक्षा असते. पण जेव्हा अडचणी येतात तेव्हाच नेमकं पाठबळ मिळालं नाही तर मग कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायचे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवे बळ मिळायचे. अनुभवी कार्यकर्ता घडवायला खूप वेळ लावतो मात्र तो गमवायला एक क्षण पुरतो असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
#मुंबई महानगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.… pic.twitter.com/JpOld4jQzC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
हेही वाचा…शरद पवारांचा आधार सोडण्याची वेळ का आली? धनंजय मुंडेंनी दिलं असं उत्तर
हेही वाचा…“भिडेंवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी”