पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. तर या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहतील असं या कार्यक्रमाचे आयोजक काॅंग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
शरद पवारांनी देखील एनडीए मध्ये यावं, यासाठी अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते यशवंत चव्हाण सेंटरवर गेले. मात्र शरद पवार यांनी एनडीएमध्ये जाण्यास साफ नकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहेत. यातच आता १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहे. या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
दरम्यान, हा कार्यक्रम ठरलेल्या नियोजनानुसार होणार असून शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. काॅंग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध करत असले तरी हा पुरस्कार राजकारण विरहित आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचंही रोहित टिळकांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा