मुंबई : महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संभाजी भिडे यांच्याविरोधात् राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुण्यातील बालगंर्धव चौकात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जोरदार घोषणाबाजी करीत भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला काॅंग्रेसच्या नेत्यांनी देखील भिडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“फडणवीसांनी ठाकरे आणि शरद पवारांची अवस्था ओसाड गावाचे पाटलांसारखी केली”, तुषार भोसलेंची टिका
त्यांचं नाव संभाजी नाहीय, हे टोपण नाव आहे. मनोहर भिडे नाव आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरूणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याचं काम हा संभाजी भिडे करतोय. हा बिनअकलेचा पेंद्या, महात्मा गांधी विरोधात बोलण्याची संभाजी भिडेची औकात काय? आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा हा बिनअकलेचा पेंद्या, महात्मा गांधीबद्दल असं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य करत असेल, तर सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…शरद पवारांनी आखली चाणक्यनिती ? अजित पवार गटाला नाही तर भाजपला बसणार मोठा फटका ?
दरम्यान, भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून नाही, तर देशातून हद्दपार केलं पाहिजे. तुमची यंत्रणा सक्रिय केली पाहिजे. तुम्हाला व्हिडीओ कसे नाही सापडतं. तुमचे लागेबंधे आहेत का ? म्हणून तुम्ही बेजबाबदारपणे वागता का ? राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तुम्ही भांग पिऊन येता का ? हे सहन केलं जाणार नाही. असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”