मुंबई : भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्ते नाही. त्यामुळे भाजपाशी त्यांचा जो संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळ व्यक्तिमत्व आहे. महात्मा गांधींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मात्र, काॅंग्रेस व इतर विरोधी पत्र त्यावरही राजकारण करत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी भाजपवर टिका केली होती. त्यावर आता भाजपकडून स्पष्टिकरण देण्यात येत आहे.
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
विरोधकांचे कामच राजकारण करण्याचे आहे. पण सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे. यशोमती ठाकूर यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने त्या भाजपावर आरोप करत आहेत. त्यांना धमकी येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपाशी जोडणे हे योग्य नाही. असंही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
दरम्यान, संभाजी भिडे यांच्याविरोधात काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी सभागृहात भूमिका घेतल्याने त्यांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?