बीड : गुरूजींना मला घडविण्यासाठी छडी देखील मारली आहे. उंच असल्यामुळे सर्वात शेवटी शाळेत बसत होती. माझे राजकीय गुरू गोपीनाथ मुंडे आहेत. असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल शिक्षक दिनाच्या निमित्ताने जुन्या आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर त्यांनी शाळेतील अनेक किस्से देखील सांगितले. काल सर्व देशभरात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
“अमित शहा उद्धव ठाकरेंना खोटे म्हणत असतील तर ही चीड आणणारी बाब”
शिक्षकामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. शाळेतील शिक्षकांमुळे मला वक्तव्य कसं करायचंय ? याची पुरेपुर माहिती मिळाली. मी अ वर्गात होते. विशेष म्हणजे माझ्या मुळे अ वर्गात गर्दी वाढली होती. त्यामुळे वर्गाची तुकडी ढ करण्यात आली. गुरूजींना मला घडविण्यासाठी छडी देखील मारली आहे. अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली आहे.
“मी मुर्ख आहे का? मी पण डॉक्टर आहे?” हाफकीनच्या मुद्द्यावरून भडकले सावंत
आमच्या दसरा मेळाव्याला गरीब माणसं येत असतात. आमचा वंचितांचा मेळावा असतो, मला जे स्थान आहे ते लोकांच्या अपेक्षा मधलं आहे. त्यामुळे हे महत्वाचे जास्त स्थान आहे. मला लोकांचे प्रेम भरभरून मिळत आहे. त्यात जास्त समाधानी आहे. चांगल्या बातम्या आल्या तर डोक्यामध्ये यश पचविते. वाईट झालं तर हाताश होत नाही. ही गोपीनाथ मुंडे साहेबांची शिकवण आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read also
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”
- “स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
- “ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
- “बारामतीत कुणीही आलं तरी काही फरक पडत नाही”
- “अहमदशाह, आदिलशहा, कुतुबशहा आता अमित शाह, दिल्लीवरून असे किती…;” शिवसेनेने भाजपला डिवचलं