पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६ जानेवारीपासून महाराष्ट्रात सभा होत आहेत. त्यामुळे एका अर्थाने एकनाथ शिंदे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला सुरूवात करत असल्याचं दिसून येत आहे. परंतु शिंदेंच्या सभेच्या आधी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे मावळात महायुतीचा तिढा वाढल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
मावळात एकनाथ शिंदेंची सभा होत असून खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला सुरूवात होत आहे. परंतु मावळात आधी सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. तर आता आमदार अण्णा बनसोडे यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळावी अशी भूमिका घेतली आहे. दादा म्हणतील तसं म्हणत पार्थ पवारांच्या उमेदवारीला शेळकेंचाही पाठिंबा आहे. महायुती म्हणून फक्त राष्ट्रवादीने नैतिकता सांभाळायची का? बारणेंना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का ? असे अनेक प्रश्न शेळकेंनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
दरम्यान, मागच्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांचा श्रीरंग बारणे यांनी मावळातून पराभव केला होता. याही वर्षी महायुतीतून मलाच उमेदवारी मिळेल, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आमदारांनी ही जागा आपल्याच मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यातच पार्थ पवारांचीही राजकारणात एंन्ट्री करायची आहे. त्यामुळे आता यावर अजित पवार आणि महायुती काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अब्दूल सत्तारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, ‘त्या’ प्रकरणावरून एकनाथ शिंदे सत्तारांना झाप झाप झापणार?
हेही वाचा…“हाड हाड ला खरोखरचं उपरती झालीय का?” चित्रा वाघ यांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक