कोल्हापूर : अदानी समुहाच्या प्रकल्पांविरोधात स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोन दिवसापुर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजू शेट्टींची भेट कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी रूचली नाही. त्यांनी थेट राजू शेट्टींचा विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, असं म्हणत लोकसभेची उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली आहे.
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. २०१४ ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वत: च्या खिशातले पैसे घालून, स्वत: चे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच राजू शेट्टी भाजपात जाऊन बसल्याचा आरोप जाधवांनी केला. राजू शेट्टी यांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली म्हणून त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देऊ नका. असंही जाधव म्हणाले.
हेही वाचा…“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
तसेच माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्ष शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, १९ वर्ष जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्यांला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्कीच विचार करेल असेही जाधव म्हणाले. त्यानंतर ठाकरेंनी जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली. तर त्यांच्या जागी दोन जिल्हाप्रमुख नेमण्यात आलं. यामध्ये वैभव उगले आणि संजय चौगूले यांचा समावेश आहे. त्यानंतर नाराज झालेल्या मुरलीधर जाधव शुक्रवारी आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे मुरलीधर जाधव शिंदे गटात जाणार का ? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
हेही वाचामंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा