सिल्लोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु तरूणांची इतकी मोठी गर्दी झाली की पोलिसांना लाठाचार्ज करण्याचा आदेश चक्क अब्दूल सत्तार यांनी पोलिसांना दिले. यावेळी अब्दूल सत्तार यांनी भरकार्यक्रमात शिवराळ भाषेत लोकांना झाप झाप झापलं. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरून काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अब्दूल सत्तार यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा….पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला. सिल्लोड या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरूणांनी हुल्लडबाजी केली. त्यानंतर संतापलेल्या अब्दूल सत्तारांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. अब्दूल सत्तार यांच्या आदेशनानंतर पोलिसांनी लाठीमार केला.
हेही वाचा…“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल
धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा. त्यांचं कम्बरडं मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे. असेही सत्तार म्हणाले. मंत्री आहे की गुंड? सांगा मुख्यमंत्री साहेब कारवाई करणार काय ? असा सवालही अतुल लोंढे यांनी केला आहे. तसेच अतुल लोंढे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये अब्दूल सत्तार असे म्हणाले की, पोलिसवाले मागच्या लोकांवर लाठाचार्ज करा, इतके मारा की त्यांच्या XXX ची हट्टी तुटून जाईल. मारा त्यांना. हे सगळे लोक म्हणाताहेत की मारा त्यांना. साल्या तुझ्या बापाने कधी कार्यक्रम पाहिला होता का ? राक्षस आहे का ? माणसाची औलाद आहे. माणसांसारखं रहा. जागेवर बसून कार्यक्रमाचं आनंद घ्या.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज करण्यात आला आहे. सिल्लोड या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना… pic.twitter.com/BsECWXQ5s9
— Atul Londhe Patil (@atullondhe) January 4, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
हेही वाचा“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका