मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अहमदनगर येथील राष्ट्रवादीच्या शिबीरात त्यांनी श्रीराम हा शाकाहारी नव्हता मांसाहारी होता, असं विधान आव्हाडांनी केलं आहे. त्यावरून विरोधकांनी आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आता हिंदू धर्माच्या देवी-देवतांबद्दल बोलून धार्मिक भावना दुखावल्या प्रकणी शिर्डी पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार अर्ज केला आहे
हेही वाचा…“सरकारमध्ये जरा संवेदना असतील तर.. नाही तर.. ” उद्धव ठाकरेंचा आझाद मैदानावरून सरकारवर हल्लाबोल
राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. असं वादग्रस्त वक्तव्य करून जितेंद्र आव्हाडांनी मोठा वाद निर्माण केला आहे. काल या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर निदर्शने केलीत. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातच आता शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे आव्हाडांना आता स्वकीयांनी घराचा अहेर दिला आहे.
हेही वाचा…“तुम्ही लाख गाड्या द्याल, पण स्वाभिमानी माणूस फक्त शरद पवारच देऊ शकतात”, अजित पवारांवर जोरदार घणाघात
दरम्यान, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे! असं ट्विट आमदार रोहित पवारांनी केला आहे.
आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका
हेही वाचा.पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार