मुंबई : राज्यातील उद्योग-व्यवसाय तसेच महत्वाचे प्रकल्प गुजरात पळवले जात असतांना महाराष्ट्रातील आघाडीची महानंद डेअरीही केंद्राच्या नॅशनल डेव्हलपेंट बोर्डाला चालवायला देऊन नंतर गुजरातच्या पर्यायाने अमूलच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं कारण देत महानंदर राष्ट्रीय दुद्ध विकास महामंडळाकडे सोपवण्याच्या हालचालींना वेग आलाय. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या चालवल्या जात आहेत. यावरून महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केला आहे.
हेही वाचा..“यांच्या बोलण्यात वागण्यात कशातच राम उरलेला नाही”, भाजपाची ठाकरे पिता-पुत्रावर जहरी टिका
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर ( महानंद ) शासनाचे संचालक मंडळ होते. शासनाचे दुग्ध मंत्री चेअरमन होते व दुग्ध खात्याचे राज्यमंत्री व्हाईस चेअरमन होते. त्यावेळी आठ लाख लिटर दूध विक्री होती. अतिशय चांगल्या प्रकारे चालले होते. लोकनियुक्त संचालक मंडळ आल्यापासून चांगले चालू होते. परंतु सध्या दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे राजेश नामदेवराव परजणे हे महानदचे अध्यक्ष आहेत आणि हे आल्यापासून महानंदास उतरती कळा लागली आहे. महिन्यातून एकदा येऊन महासंघ चालवीत आहेत , महासंघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे महासंघाचे पॅकिंग विक्री पूर्णपणे कमी झालेली आहे . याचा कामगार संघटनेने ही त्यांना जाब विचारला होता. असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा….पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला करणार उपवास, सरयु नदीतही मोदी स्नान करणार
दरम्यान, पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, महासंघाची 27 एकर जागा व NDDB ला पूर्वी दिलेली पाच एकर अशी एकूण 32 एकर जागा हडप करण्यासाठी म्हणून महानंद NDDB च्या म्हणजे गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा डाव आहे. NDDB च्या ताब्यात महानंद देण्याऐवजी तुकाराम मुंडे , यांचे सारखे चांगले कडक अधिकारी व दूध व्यवसायातील महाराष्ट्रातील अनुभवी चांगले संचालक घेऊन महानंदहा चांगल्या रीतीने चालवू शकतो. NDDB ला 350 कोटी रुपये शासन देणार आहे. त्या ऐवजी 125 कोटी कर्मचारी VRS साठी महानंदला दिले तर महानंदा अतिशय चांगल्या प्रकारे चालू शकते व NDDB च्या ताब्यात जाण्यापासून वाचू शकते. यापूर्वी महानंद चे 150 कोटी रुपये ठेवी शिल्लक होत्या तसेच गतवर्षी अजितदादांनी दूध पावडर चे 80 कोटी शासनाचे माफ केले आता हे सर्व पैसे संपले आहेत. म्हणून महानंद NDDB ला देण्याचा डाव आहे. आपल्या म्हेवण्याचा लाड पुरवण्यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे. राजेश नामदेवराव परजणे हे मंत्रालयात बसून महानंदचा कारभार पाहत आहेत. असंही संजय राऊतांनी सांगितलेय.
विखे पाटील उत्तर द्या!महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर ( महानंद ) शासनाचे संचालक मंडळ होते शासनाचे दुग्ध मंत्री चेअरमन होते व दुग्ध खात्याचे राज्यमंत्री व्हाईस चेअरमन होते त्यावेळी आठ लाख लिटर दूध विक्री होती अतिशय चांगल्या प्रकारे चालले… pic.twitter.com/lZBX5nisgV
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 4, 2024
READ ALSO :
हेही वाचामंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
हेही वाचा…“श्रीराम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता,” आव्हाडांच्या वक्तव्यानंतर मोठा वाद, गुन्हा दाखल
हेही वाचा“आपल्याकडे ब्रॅंड शोधण्याची गरज नाही, आपला ब्रॅंड फक्त शरद पवार”
हेही वाचा…“22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मास बंदी करा,” भाजपच्या ‘या’ आमदाराने केली मागणी
हेही वाचा…“सहकार बुडवणारे सरकार, सरकारच्या महाराष्ट्रद्रोही कृतीचा तीव्र निषेध”, राज्यातील विरोधक आक्रमक