मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ काही दिवसापुर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत पावसाळी अधिवेशनात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पेन ड्राईव्ह देत चौकशी करण्याची मागणी केली. परंतु सोमय्यांचा व्हिडीओ प्रसारित करण्याऱ्या संपादकांवर गुन्हा दाखल झाला, पण सोमय्यांवर अद्यापही गुन्हा का दाखल झाला नाही. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…राज्यात काका-पुतण्याचा आणखी एक संघर्ष, काका अजित पवारांवर ‘या’ पुतण्याची पहिल्यांदाच टिका
पावसाळी अधिवेशनापुर्वी भाजपनेते किरीट सोमय्या यांचा अश्लिल व्हिडीओ लोकशाही न्यूजने प्रसारित केला होता. त्यानंतर सोमय्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात अंबादास दानवे यांनी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हेंंकडे पेन ड्राईव्ह देखील देण्यात आला होता. त्याची अद्याप काहीही चौकशी करण्यात आली नाही. परंतु यातच आता लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून संपादकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सोमय्यांवर का नाही ? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय”, सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या संपादकावर गुन्हा दाखल
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू. मात्र,असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील. असं लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांनी म्हटलंय. त्यावर आता लोकशाही पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय.राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! असा घणाघात देखील त्यांनी केलाय.
पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ?
भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय…राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! https://t.co/hTrfZ06r5L
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा