मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ काही दिवसापुर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. किरीट सोमय्यांचा व्हिडीओ लोकशाही न्यूजने प्रसारित केला होता. त्यातच आता लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टिका केलीय.
हेही वाचा…“मराठा समाजाने आता संयम बाळगावा, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी”, एकनाथ शिंदेंचं आंदोलकांना आवाहन
भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात या आधीही सहकार्य केले होते, यानंतरही करू. मात्र,असं असलं तरीही जनतेची भूमिका आणि प्रश्न मांडण्याचे काम अव्याहतपणे सुरू राहील. असं लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांनी म्हटलंय. त्यावर आता लोकशाही पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय.राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! असा घणाघात देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…“लाठीचार्जचे आदेश वरिष्ठांनी दिले सिद्ध करा, तुम्ही सांगाल ते..,” अजित पवारांनी विरोधकांना दिलं खुलं चॅलेंज
दरम्यान, किरीट सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून जोरदार टिका करण्यात आली होती. यातच या व्हिडीओची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आलीय.
पत्रकारांनी फक्त भाजपचे गुणगान गायचे हे राज्य सरकारला अपेक्षित आहे का ?
भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय…राज्यातील जनतेचा जीव कोंडू लागला आता ! https://t.co/hTrfZ06r5L
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 6, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारानंतर ठाकरेंची तोफ जळगावात धडाडणार, आगामी काळात सभांचा पाऊस पडणार
हेही वाचा…शरद पवारांची ताकद वाढली, माजी आमदाराचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश, विरोधकांना बसला धसका
हेही वाचा…“तेव्हा डोकी फोडली जातात अन् खोके सरकारमध्ये जनरल डायर अवतरतात,” आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात
हेही वाचा…अजित पवारांचा खंदे समर्थक आमदार अडचणीत, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा पेपर अवघड जाणार ?
हेही वाचा…वडिल लोकसभेवर गेले तर लेकींच्या राजकीय पदार्पणाचा मार्ग सोपा, नांदेडचं राजकीय गणित काय?