मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पणन मंत्री अब्दूल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आला.
हेही वाचा…“भाजपची ही दादागिरी, सत्तेची मस्ती आणि मुस्कटदाबी अती होतंय”, सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या संपादकावर गुन्हा दाखल
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत-जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अस एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…शरद पवारानंतर ठाकरेंची तोफ जळगावात धडाडणार, आगामी काळात सभांचा पाऊस पडणार
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपातही करण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा
हेही वाचा…राज्यात काका-पुतण्याचा आणखी एक संघर्ष, काका अजित पवारांवर ‘या’ पुतण्याची पहिल्यांदाच टिका