IMPIMP

शिवसेनेच्या मुखपत्रातून फोडला गेला राजकीय बॉम्ब, अजून एका ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाचे संकेत?

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कनिष्ठ बंधू तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देताना, शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी, ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या पहिल्या पानावरच, “एक घाव, दोन तुकडे”, “शिवसेनेचे व्हिव्हियन रिचर्ड्स” अशी जाहिरात दिली आहे. त्यांच्या या शुभेच्छांमुळे, हे तेजस यांच्या राजकीय प्रवेशाचे संकेत मानले जात आहेत.

२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान

त्यामुळे, आता त्यांची ही जाहिरात सामनात देण्यामागे राजकीय उद्देश असल्याचे मानले जात आहे. तसेच, त्यांनी तेजस यांना ‘रिचर्ड्स’ का संबोधले यावरही आता चर्चा सुरु झाली आहे. याचे उत्तर त्यांना विचारले असता, “तेजस रिचर्ड्स यांच्यासारखे झुंजार आहेत, त्यामुळे मी उपमा दिली”, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, या हटके शुभेच्छांमुळे तेजस ठाकरे यांचं राजकारणात लाँचिंग होत आहे की काय याची चर्चा आता सुरु झाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाच्या कंड्या पेटवू नका; बातम्या कमी पडल्या तर मला मागा – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे आणि वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेची जबाबदारी दिली गेली आहे. याचा विचार करता आता तेजस यांच्या निमित्ताने शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन आगामी महापालिका निवडणूका आपल्या खिशात करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे.

महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार

दुसरीकडे, तेजस ठाकरे नावाप्रमाणेच आहेत, ते जे काही करतात त्याला हॅट्स ऑफ, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलंय. तेजस ठाकरे राजकारणात येणार का? असं म्हणण्यापेक्षा आधीपासूनच ते राजकारणात आहेत, पण त्यांच्याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

२०२४ ला आमचं एकच इंजिन असणार; देवेंद्र फडणवीस यांच मोठं विधान

Next Article

मिसेस फडणवीसानंतर आता मिस्टर फडणवीस; पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी मोदींच्या नावाची कुरघोडी?

Related Posts
Total
0
Share