नाशिक : भारतीय खेळ महासंघातर्फे दरवर्षी १४/१७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर महासंघाने मान्यता दिलेल्या सुमारे ९० खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत प्रत्येक राज्याचा संघ हा शासनातर्फे आयोजित स्पर्धांमधून निवडला जातो. या स्पर्धेत महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच चांगली असते मात्र यंदा आपले खेळाडू या स्पर्धे पासुन वंचीत राहतात कि काय अशी स्थिती होती मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भाजप प्रवक्ते प्रवीण अलई यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून खेळाडूंचा पुढील मार्ग आता सुकर झाला आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष
प्रवीण अलई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली दोन वर्षे कोरोना काळ असल्याने व भारतीय महासंघात दोन गट झाल्याने, स्पर्धा होत नव्हत्या. अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये एकमत झाल्याने नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.कमी कालावधीत सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी सर्व खेळांच्या स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याने, यंदा फक्त १९ वर्षांखालील शालेय खेळाडूंसाठी २१ खेळांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिल्ली, भोपाळ आणि ग्वाल्हेर येथे ६ ते १२ जुन दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांकरिता प्रत्येक खेळासाठी राज्याची प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख हि २९ मे आहे.
हेही वाचा…“..तर कर्नाटकात ‘RSS’ वर बंदी आणू, ” कर्नाटकात काॅंग्रेस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
पुढे बोलताना अलई म्हणाले, देशातील काही राज्यांचे सदर स्पर्धेसाठी प्रशिक्षण शिबीर सुरु झाले असता, मात्र देशातील क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात, राज्यातील उगवते खेळाडू या स्पर्धे पासुन वंचीत राहू नये आणि या खेळाडूंच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी लवकरात लवकर २१ खेळांसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात यावे व त्यातून निवडलेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात यावे, यासाठी खात्याचे कर्तव्यदक्ष मंत्री गिरीश महाजन यांना सदर बाब लक्षात आणून देताच त्यांनी राज्य क्रीडा आयुक्त यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने 12 तासाच्या आत परिपत्रक जाहिर करण्यात आल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. या निर्णयाबद्दल मनस्वी आभार व विद्यार्थ्याचे अभिनंदन.
READ ALSO :
हेही वाचा…डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ नावाचा लवकरच चित्रपट बनवणार, राऊतांची मोठी घोषणा
हेही वाचा…ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पटोलेंची फिरकी, १६ आमदारांबाबत नार्वेकरांना निवेदन दिलं पण.. व्हिडीओ व्हायरल..
हेही वाचा…पुण्यात भाजपने भाकरी फिरवली, पुण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“नाना पटोलेंचं ‘प्रदेशाध्यक्ष पद’ जाणार”,? काॅंग्रेसची एक टीम दिल्लीत दाखल, पटोले वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…अजित पवार, आदित्य ठाकरेंनंतर आता नाना पटोलेंही झाले ‘भावी मुख्यमंत्री’, डोंबिवलीत झळकले बॅनर्स