मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता राज्यात राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लावण्यात येत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता काॅंग्रेसच्या नेत्यांचेही अशा पद्धतीने पोस्टर्स लावण्यात येत असल्याने एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडीच्या नादाला लागू नका, अन्यथा…” प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना लाखमोलाचा सल्ला
कर्नाटक विधानसभेच्या निकालात काॅंग्रेसने मोठी उसंडी मारली आहे. यानिकालानंतर काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत गुरूवारी सांयकाळी हाथ से हाथ जोडो अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी गौरव पुरस्कार विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा…नाशिकची मोठी फौज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश
या कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवलीत लावण्यात आलेल्या फलकांवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेल करण्यात आला आहे. या व इतर फलकांवर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या छायाचित्रासोबत त्यांच्या नावाचा कोठेही उल्लेख नसल्याने काॅंग्रेसमधील एक गट नाराज झाला असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर मुंबईत लावण्यात आले. त्यानंतर नागपुरात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे अशाच पद्धतीचे पोस्टर कार्यकर्त्यांनी लावले. आता डोंबिवलीत नाना पटोले यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…सत्तासंघर्षाच्या निकालानंतर नार्वेकर पहिल्यांदाच दिल्लीत, भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी ? निर्णायाकडे लक्ष
हेही वाचा…“..तर कर्नाटकात ‘RSS’ वर बंदी आणू, ” कर्नाटकात काॅंग्रेस मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
हेही वाचा…“ठाकरे, शरद पवारानंतर आता केजरीवाल राहुल गांधीच्या भेटीला जाणार”, मोदीविरोधात एकजूट बांधणार
हेही वाचा…“तु माझ्या मागे ईडी लावली, मी तुझ्या मागे मोक्का लावला,” खडसे अन् महाजन यांच्यात जंपुली
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी केली ४ कोटीची मागणी..! पक्षप्रवेशासाठी पैसे नसल्याने दिपाली सय्यदने दाऊदशी संपर्क केला, माजी पीएचा खळबळजनक दावा