नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्ते, पदाधिकारी शिदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. यातच उत्तर महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
उत्तर महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच अन्य पक्षांतील २० ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये उबाठा गटाचे माजी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, इंदुमती संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, चांदवड कृषी उत्तन्न बाजार समिती संचालक निवृत्ती घुले, छावा संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता आबा गांगुर्डे, युवासेना तालुका प्रमुख रोहित ठाकरे, उत्तम मापारी, बाळासाहेब झालटे, दिगंबर चव्हाण, संदीप चव्हाण यांच्यासह अनेक सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं
यावेळी राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सचिव भाऊसाहेब चौधरी, तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेले एक सकारात्मक पाऊल म्हणालया हवे. या सर्वांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्या दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच सरकारच्या माध्यमातून गावपातळीवरील प्रश्न सोडवण्यास निश्चित प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलं.
उत्तर महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच अन्य पक्षांतील २० ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी काल #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यासमयी उबाठा गटाचे माजी तालुका प्रमुख शांताराम ठाकरे, इंदुमती संस्थेचे संस्थापक विकास भुजाडे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती… pic.twitter.com/5mLkucOFzU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी’ रेकार्ड ब्रेक खासदार निवडून आणतील”, एकनाथ शिंदे
हेही वाचा…“ठाकरे गटातील ‘ते’ खासदारही शिंदे गटात जाणार”,? शिवसेना खासदाराचा दावा
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”