मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षपदाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याने आता बच्चू कडू राज्यमंत्री झाले आहेत. याबाबती शासनाने परिपत्रक काढले आहे. गेल्या वीस वर्षापासून बच्चू कडू दिव्यांगासाठी लढा देत आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
बच्चू कडू सातत्याने मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करीत आहेत. तसेच मंत्रीपद मिळालं नाही तर वेगळी भूमिका घेणार असंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यावर आता शिंदे-फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली. नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने मजबूर झाले आहेत. असं म्हणत छुपना भी नहीं आता बताना भी नहीं आता त्यांची अशी अवस्था झाली असल्याचा टोलाही त्यांनी बच्चू कडू यांना लगावला.
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
दिव्यांगाचं अभियानामध्ये सचिव, कलेक्टर, सर्व अधिकारी हे सर्व एका छताखाली दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. फक्त सेवेसाठी हे अभियान असून मतदार संघात करत असलेल्या कामांसारखाच काम या अभियानात केलं जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दिव्यांगंचं काम केलं जाणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
दरम्यान, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीतील राज्य मंत्री पद सोडून शिंदेंच्या बंडात सहभागी झालेत. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बच्चू कडूंना मंत्रिपदाची आशा लागून राहिली होती. त्यांनी अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलूनही दाखवली होती. त्याचाच परिणाम म्हणून बच्चू कडू यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा नुसता”दर्जा”देऊन दुधाची तहान ताकावर भागवली.नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने “मजबूर”झाले आहेत …
छुपाना भी नहीं आता
बताना भी नहीं आता
त्यांची अशी अवस्था झाली आहे.@RealBacchuKadu— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
हेही वाचा…“बरं का..! ‘चित्रा काकू’ तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत”, अयोध्या पोळ अन् चित्रा वाघ यांच्यात ट्विटवार
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?