नागपुर : काॅंग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष शिस्त पालनाचा ठपका आशिष देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या काय पर्याय आहेत ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अलिकडेच भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
राज्यात १९९५ ते २०१४ पर्यंत सलग आमदार राहिलेल्या अनिल देशमुख यांना २०१४ मध्ये काटोल विधानसभेत भाजप उमेदवार आशिष देशमुख यांनी हरवलं होतं. २०१९ च्या आधी आशिष देशमुख यांनी भाजप सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे आता देशमुख पुन्हा भाजपात येऊन २०१४ मध्ये वसुलीचे आरोप असलेल्या अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणुक लढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मागील काही कारणांमुळे देशमुखांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केली होती. याचाच परिणाम म्हणून देशमुखांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतरही ते काॅंग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यातच आता काॅंग्रेसच्या समन्वय समितीने त्यांना ६ वर्षासाठी काॅंग्रेसमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?