नागपुर : काॅंग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांना काॅंग्रेसमधून ६ वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष शिस्त पालनाचा ठपका आशिष देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या काय पर्याय आहेत ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अलिकडेच भाजपच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी मागील काही कारणांमुळे देशमुखांचा वाद झाला. त्यानंतर त्यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर त्यांनी खासदार राहुल गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केली होती. याचाच परिणाम म्हणून देशमुखांना काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतरही ते काॅंग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी सांगितले. यातच आता काॅंग्रेसच्या समन्वय समितीने त्यांना ६ वर्षासाठी काॅंग्रेसमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
नागपुर विभागातील काटोल विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचं वचर्स्व असून याठिकाणी अनिल देशमुख आमदार आहेत. तर सावनेर मतदार संघात काॅंग्रेसमधून सुनील केदार आमदार आहेत. भाजप ह्या दोन्ही मतदार संघावर लक्ष ठेऊन आहे. यातच आता आशिष देशमुख यांना भाजपमध्ये घेऊन या दोन्ही पैकी एका मतदारसंघात उतरवण्याचा भाजपचा डाव असल्याचीही चर्चाही रंगली आहे.
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिष देशमुख यांची भेट घेतली. या भेटीनंतर आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव