पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन बराच कालावधी गेला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा असूनही रखडलेला आहे. अलिकडेच राज्यातील मंत्र्यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या एक ते दोन आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात पुणे जिल्ह्यासाठी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
आगामी काही काळात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपची सत्ता राखण्यासाठी तसेच पुण्यातील मतदारसंघ अजून भक्कम करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याचा विचार केला जाऊ शकतो.
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
त्यामुळे पुणे जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एख राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये पार्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ, दौंड मतदार संघाचे आमदार राहुल कुल आणि भोसरी मतदार मतदारसंघाचे महेश लांडगे ही तीन नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आली आहे. राहुल कुल यांनी याआधीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहर असा समतोल साधण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळ विस्तारात केला जाऊ शकतो.
READ ALSO :
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका