भंडारा : भंडारा-लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत काॅंग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. आज झालेल्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत काॅंग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आपला गड कायम राखण्यात यश मिळालं आहे . यामुळे काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंद साजरा केला.
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल
लाखांदूर कृषी उत्तन्न बाजार समितीची १३ संचालक पदासाठी ३० एप्रिल रोजी निवडणुक पार पडली. या निकालात काॅंग्रेसच्या पॅनेलनं दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे काॅंग्रेसकडे सत्तेची चावी पुन्हा आली आहे. काॅंग्रेस प्रणित शेतकरी- शेतमजूर, बहुजन विकास पॅनलचे ८, व अविरोध ३, भाजप-राष्ट्रवादी युती प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलेचे ५ व अविरोध २ असा निकाल घोषित करण्यात आला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीला शुन्य जागावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
दरम्यान, काॅंग्रेस समर्थित पॅनलचे सुभाष राऊत, लोकेश भेंडारकर, ओमप्रकाश सोनटक्के, मनोहर राऊत, मनोज मेश्राम, सुरेश ब्राम्हणकर, अविनाथ शिवणकर, रामभक्त मिसार, रजनी घोरमोडे, देविदास पारधी, ज्ञानेश्वर बुरडे विजयी झाले. तर भाजप- राष्ट्रवादी युती पॅनलचे प्रमोद प्रधान, मुकेश भैय्या, प्रतिक्षा देशमुख, प्रकाश शिवनकर, तेजराम दिवटे, डेलीस ठाकरे, प्रकाश चुटे, हे निवडून आले.
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना