मुंबई : देशाच्या लोकसभा निवडणुका ह्या २०२४ च्या मे मध्ये होऊ घातल्या आहेत, त्याआधी भाजपने देशात केंद्रीय मंत्र्यांची फळी मैदानात उतरवली आहेत. कारण सध्याचं राजकीय गणित भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र, बिहार, आणि कर्नाटक येथील राजकीय गणितं बदलल्याने भाजपने याचा मोठा धसका घेतला आहे.
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बहुमताचा २७२ आकडा ओलांडून ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर काॅंग्रेसला फक्त ५१ जागा मिळाल्या. भाजपला सर्वाधिक खासदार हे उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६२, मध्यप्रदेशातील २९ पैकी २८, राजस्थानातील २५ पैकी २४, कर्नाटकमधील २८ पैकी २५, महाराष्ट्रातील ४८ पैकी २५, आणि गुजरातमधील २६ पैकी २६ खासदार मिळाले होते. मात्र या महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या तिन्ही राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, तर बिहारमध्ये नितीश लालु यादव एकत्रित आल्याने जातीय समीकरण बदललं आहे. तर कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांचा करिश्षा चालला नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला याठिकाणी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
दरम्यान, भाजपने ह्या सर्व निवडणुकां धसका घेतला असून केंद्रीय मंत्र्यांचे दौरे ही सुरू करून दिले आहेत. यातच देशात विरोधक एकजूट बांधण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत