मुंबई : येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं, अशी मागणी करत देशातील १९ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावरून आता राज्यात एकमेकांवर टिका टिप्पणी केली जात आहे. यातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि शिवसेनेच्या नेत्या अयोध्या पोळ यांच्यात ट्विटवार रंगलं आहे.
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्यांच्या विकासाच्या दृष्टीकोणाची अॅलर्जी आहे. त्यातूनच लोकशाहीचं मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची द्रुर्बुद्धी सुचली आहे. हे सगळे संकुचित मनोवृत्तीचे पुतळे आहेत. जनतेनं तीनशेपेक्षा जास्त खासदार संसदेत पाठवून नरेंद्र मोदींवर विश्वास दाखलवा आहे. काही पक्ष ५० खासदारांच्या पुढे गेले नाही, काही पक्षांना भोपळा फोडता आला नाही तर काहींचा पक्षच उरला नाही. खऱ्या अर्थानं संसदेच्या कार्यक्रमाला बॉयकॉट करणाऱ्यांना जनतेनंच बॉयकॉट केलं आहे. असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
चित्रा वाघ यांच्या ट्विटला अयोध्या पोळ यांनी उत्तर दिलं आहे. जागतिक स्तराच्या एकमेव महिला नेत्या तथा आमच्या लाडक्या चित्रा काकू यांना आदिवासी राष्ट्रपतींची अॅलर्जी का आहे? संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती अन् त्यातल्या त्यात महिला राष्ट्रपती म्हणून त्यांच्या हसते केले असते ना. आणि बरं का चित्रा काकू तुम्ही म्हणजे काही पुर्ण देश नाहीत हं. असंही म्हणत चित्रा वाघ यांनी विचित्र असाही टोला लगावला आहे.
विरोधी पक्षांना पंतप्रधान @narendramodi जीं च्या त्यांच्या विकासाच्या दृष्टीकोनाची ॲलर्जी आहे त्यातूनच लोकशाहीचं मंदिर नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करण्याची दुर्बुद्धी सुचलीये..
हे सगळे संकुचित मनोवृत्तीचे पुतळे..
जनतेनं तीनशे पेक्षा अधिक खासदार संसदेत पाठवून पंतप्रधान…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…२०१४ साली फडणवीसांना दिली होती टक्कर, काॅंग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…२०२४ साली मोदींना ‘हा’ बडा नेता टक्कर देणार ? भाजपला धक्कातंत्र, सर्वेमधून आली महत्वाची माहिती
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?