नागपुर : शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांसोबत १३ खासदारांचाही आगामी निवडणुकीत पराभव होईल. असा दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून आता शिंदे- आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच आता ठाकरे गटातील आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमने यांनी केला आहे. नागपुर येथे ते बोलत होते.
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा राज्यातील सर्वात कमकुवत पक्ष,” प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, ‘कारण’ही सांगितलं
ठाकरे गटाकडे असलेले उरलेले सर्व खासदार लवकरच शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार असल्याचं कृपाल तुमने यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मोदी सरकारमधील मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणरेड्या शिव्या दिल्या”, मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
दरम्यान, संजय राऊतांनी जो दावा केला आहे. तो दावा खोटा ठरणार आहे. आमचे सर्व १३ चे १३ खासदार निवडून येतील. त्यामुळे आता ठाकरे गटातील खासदार देखील शिंदेंच्या सोबत येण्याचं सांगत असल्याचं कृपाल तुमने यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंचा ‘हिरा’ चमकला…! मालेगाव बाजार समितीत ठाकरे गटाची सत्ता ; दादा भुसेंना मोठा धक्का
हेही वाचा…“पटोले-पटेल मध्ये वैर, भाजपने साधला डाव, आमगाव गोंदिया बाजार समितीत ‘भाजप-राष्ट्रवादी’चा विजय”
हेही वाचा…“नागनाथ-सापनाथ एकत्र आले, पण आमच्याकडे ‘एकनाथ’आहे, आमचचं सरकार पुन्हा येणार”
हेही वाचा…“माझ्यामुळे इतरांचं काॅंग्रेसमध्ये वजन कमी होईल, अशी काही दुकानदार नेत्यांना भीती”, देशमुखांचा पटोलेंवर हल्लाबोल
हेही वाचा…“शिंदे-फडणवीसांनी बच्चू कडूंना मंत्री पदाचा नुसता दर्जा देऊन दुधाची तहान ताकावर भागवली”, राष्ट्रवादीने डिवचलं