मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा सिलसिला सुरु असल्याचं दिसतं आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची २० मिनिटे चर्चा झाली.
आरक्षण ही केंद्राचीच जबाबदारी, चंद्रकांत पाटील म्हणतात…
महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ने गती घेतलीय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का?; फडणवीस म्हणतात…
महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.
Read Also :
- मराठा आरक्षण: केंद्रानेच आता भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंनी सांगितला उरलेला एकच पर्याय
- “चंद्रकांतदादा महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते”
- मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
- “कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार, मात्र…” पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- वर्षावरच्या ‘त्या’ बैठकीत काय झाले? स्वतः शरद पवारांनी केला मोठा खुलासा