मुंबई : विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्षानं, गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील वर्षी गोवा विधानसभेची निवडणूक होत आहे. दरम्यान, यावरून गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्रातून फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या या व्यंगचित्राची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी
राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांच्या प्रचारात फडणवीस यांनी, ‘मी पुन्हा येईन’चा नारा दिला होता. यात त्यांनी, भाजपला सर्वाधिक जागा मिळवून तर दिल्या मात्र पक्षाला सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे, ‘मी पुन्हा येईन’ च्या नाऱ्यावरून विरोधकांकडून फडणवीसांना सातत्याने डिवचलं जातं. त्यांनतर आता त्यांना दिल्या गेलेल्या नवीन जबाबदारीवरूनही ‘मी पुन्हा येईन’चा संदर्भ घेऊन त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने गोवा में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/D4svb8Bjho
— BJP (@BJP4India) September 8, 2021
पटोलेंचा पवारांना टोला, म्हणाले “काँग्रेसनं जमीनी राखायला दिल्या अन् त्यांनी…”
क्रास्टो यांनी काढलेल्या या व्यंगचित्रात, गोव्याच्या बीचवर पर्यटकाच्या रंगीबेरंगी वेशभुषेत फडणवीस उभे असून, त्यांच्या हातात ‘मी पुन्हा येईन’ असा फलक आहे. त्यावर, ‘आव गोयंचो सायबा’ असंही त्यांनी लिहिलं आहे. दुसरीकडे, गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत, भाजपला पुन्हा सत्ता मिळेल,” असा विश्वास दर्शवला आहे.
शरद पवारांनी केलेलं करेक्ट वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय; फडणवीसांचा परफेक्ट निशाणा
देशात, २०२२ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचही राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार फडणवीस यांनीं मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु,” असे ते यावेळी म्हणाले आहेत.
Read Also :
- आधी डरकाळी फोडली, आता नरमाईचा सूर? राणे तीनच दिवसांत पलटले
- ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच बाप्पा चरणी प्रार्थना – देवेंद्र फडणवीस
- ‘हे’ दोन बडे नेते करत आहेत भाजप-शिवसेनेतले अंतर कमी? चर्चांना उधाण
- नेता-अभिनेता असला तरी घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही! नांगरे पाटीलांनी ठणकावले
- उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी आजच्या काँग्रेसची अवस्था – शरद पवार