मुंबई : महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी गुरुवारी विधानसभेत बहुप्रतिक्षीत शक्ती विधेयकाला मंजूरी मिळाली होती. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिला गुन्हा हा शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांच्यावर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली. विधानसभेत गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी भाजपला झोंबणारे वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावरुन आता चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी अजय चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप
चित्रा वाघ यांनी ट्विट करुन ही मागणी केली. महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे आमदार अजय चौधरी यांच्या आजच्या विधानातून दिसून आलंय. त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरली आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे आमदार अजय चौधरी यांच्या आजच्या विधानातून दिसून आलंय… त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय..
माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा..!@maharashtra_hmo
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 23, 2021
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रत्येक माता-भगिनीचा आदर झाला पाहिजे असे म्हणाले. यामध्ये पक्षीय राजकारणही येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. पण भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी जरासं काही झालं की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात. मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, असा सवाल अजय चौधरी यांनी उपस्थित केला.
Read also:
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले
- भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार